कोरोनाचा तिसरा टप्पा धोकादायक, लॉकडाउनने थांबला नाही तर चीन ने केलेल्या मार्गांचा अवलंब करावा लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ;नवी दिल्ली;कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याच्या आधीच देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. लॉकडाउन करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर चीनने जे मार्ग अवलंबले ते भारतालाही करावे लागतील.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांच्या गरजेनुसार दिल्लीसाठी नियमावली तयार करणाऱ्या आयएलबीएसचे संचालक डॉ. एस के सरीन यांनी एक सल्ला सरकारला दिला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख व्हायला हवी. त्यासाठी चीन आणि दक्षिण कोरियाप्रमाणे जीपीएसचा वापर करायला हवा.

सध्या तरी कोरोनाला पुढच्या टप्प्यात जाण्यापासून रोखण्याची तयारी सुरु करायला हवी. जागतिक स्तरावर कोरोनाच्या कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव आणि भारतातील प्रत्येक राज्यात याचा प्रसार कमी अधिक वेगाने होत आहे. त्या राज्यातील परिस्थितीनुसार रणनिती तयार करायला हवी असं मतही सरीन यांनी मांडलं.
दिल्लीत कोरोनाला रोखण्यासाठी जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये दरदिवशी 100 रुग्ण, त्यानंतर 500 आणि 100 अशा टप्प्यांना गृहीत धरलं आहे. त्यानुसार काम सुरु आहे. याचा अर्थ असा नाही की दिल्ली किंवा देशात तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मात्र याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यांत कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी करायला हवी त्यासाठी तिसऱ्या टप्प्याच्या घोषणेची वाट बघण्याची गरज नाही असंही सरीन यांनी सांगितलं.
चीनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 26 हजार रुग्णांची ओळख पटली होती. त्यातून 25800 रुग्णांपर्यंत जीपीएसच्या मदतीनं पोहोचता आलं होतं. जगात कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसला आहे तो इटलीला. आतापर्यंत इटलीत 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इराण, अमेरिकेतही कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजारपेक्षा जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *