महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला तसेच मंदिरात आकर्षक फुलांची व बेलाच्या पानांची आरास करण्यात आली. या सजावटीसाठी 700 किलो बेलपानांचा वापर करण्यात आला आहे. रमेश पांडूरंग कोळी, राणी रमेश कोळी, रुतुजा कोळी, ऋषिकेश कोळी, नवनाथ खिलारे (र.पंढरपूर) या भक्तांनी ही पूजा अर्पण केली. पंढरपूरच्या साई डेकोरेटर्स यांनी ही सजावट केली आहे.