महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । सध्या उत्तर भारतातील वातावरणात चांगलाच बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र, आता हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. तापामनात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा लागत आहेत. तर काही जिल्ह्यामध्ये तापमान पुन्हा घसरल्याचे पाहायला मिळाले. नाशिक, पुणे, सातारा, गडचिरोली या ठिकाणी तापमान घसरले आहे. तापमानात चढ उतार सरुच आहे.