देशातील पेट्रोल-डिझेल दरवाढीचा पुढच्या आठवड्यात उडणार भडका ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्चनंतर भडका उडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने रशिया-युक्रेन युद्धामुळे 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपच्या एकूण मागणीपैकी एकूण 35 टक्के पुरवठा हा रशियाकडून होतो. रशियाकडून भारताला देखील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. या सप्लाय चेनवर युद्धाचा परिणाम हा होणार असून आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.

2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून ही किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल एवढी झाली आहे. देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. 7 मार्च रोजी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून पाच राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 10 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आता निकालानंतर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *