सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खा, ‘हे’ होतील फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । अन्नाची चव तुपामुळे वाढते. त्यामुळे बहुतेक जण पोळी, भात, वरण, आमटी, पराठा अशा अनेक पदार्थांवर तूप घालून खातात, मात्र अन्नाची पौष्टिकता वाढवणे एवढाच तुपाचा फायदा नाही, तर तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत, कारण तुपात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. या गुणधर्मांचा फायदा होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी तूप खाण्याचा सल्ला आयुर्वेदानुसार दिला जातो.

तूप उत्तम खाद्यपदार्थांपैकी एक मानले जाते. कारण तुपात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ओमेगा 6 यासारखी शरीरासाठी उपयुक्त स्निग्धाम्ले, जीवनसत्त्व ए, इ, क, फॅट, प्रथिने असे पौष्टिक घटक असतात. हे घटक उत्तम शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहेत. शरीराची ताकद, ऊर्जा वाढवणे तसेच उत्तम स्वास्थ्याकरिता दररोज उपाशीपोटी फक्त एक चमचा तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत.

निकृष्ट आहार, तणाव, अपुरी झोप, बैठी जीवनशैली, प्रतिजैविकांचा वापर यामुळे आतड्यांचे कार्य बिघडू शकते. या समस्यांपैकी तुम्हाला जर कोणतीही समस्या असेल तर दररोज तुपाचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे पोटाचे कार्य सुधारण्यास मदत होईल. तूप खाल्ल्याने लहान आतड्यांचे कार्यही सुधारते. याकरिता आहारात तुपाचा समावेश करणे आवश्यक आहे.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शिवाय बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारख्या समस्येवरही आराम मिळतो.

तूप खाल्ल्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. तुपामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा चमकदार, उजळ दिसू लागते. नियमित तूप खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि त्वचेशी संबंधित इतर समस्याही कमी होऊ लागतात. त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल, तर आहारात तुपाचा समावेश करायला सुरुवात करा.

दररोज तुपाचे सेवन केल्याने अनियमित मलविसर्जन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो. जर दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रिकाम्या पोटी तूप खावे.

तुपामुळे भूकेवरही नियंत्रण राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तूप खाणे हा उत्तम पर्याय आहे. तुपामुळे आतड्यांचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. हाडांची ताकद वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *