महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । महाराष्ट्रात जन्मलेल्या थोर पुरूषांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणार्थ कार्य केले आहे अशा थोर महान क्रांतिकारी पुरुषांच्या कार्याचा गौरव करण्या ऐवजी माननीय राज्यपाल महाशय भगतसिंग कोशारी साहेब त्यांची उघड उघड सार्वजनिक रीत्या थट्टा मस्करी करत आहेत….जे त्यांच्या पदाला अशोभनीय आहे….अज्ञाना मुळे म्हणाव की इतर कोणाच्या सांगण्यावरून म्हणाव हया महाशयांनी राजे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले….त्याचे पडसाद संपत नाही तोपर्यंत क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुलेंच्या बाबतीत विचित्र हास्य करून त्यांच्या त्या वेळेच्या लग्नाच्या वयाविषयी थट्टात्मक मस्करी स्वरूप विधाने केलीत….कदाचीत तत्कालीन वेळेस राज्यपालांच्या आजोबा पणजोबांचेही लग्न त्याच वयात झालेत असावे…..पण कसलेही भान ठेवता , समजून उमजून थोर पुरूषां बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या बद्दल आम्ही राज्यपाल ह्या पदाचा नाहीतर भगतसिंग कोशारी यांचा जाहीर निषेध करीत आहोत….. कोशारी महाशयांनी आमच्या दैवतां बद्दल चुकीची व अपमानास्पद विधाने करून महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून महाशयांनी संवीधानीक पदाच्या पात्रतेचा सन्मान ठेवून आपली चुकीची वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन जनतेची माफी मागण्यातच शहाणपणाचे ठरेल……पि .के.महाजन:– उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद….पिंपरी-चिंचवड शहर.