PM मोदींच्या प्रयत्नांना यश ; भारतीयांना खारकिव्हमधून ‘रशियामार्गे’ बाहेर पडता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । russia ukraine live news: भारतीयांना खारकिव्हमधून बाहेर पडता यावं यासाठी रशियाने भारताला संपूर्ण सहकार्य दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना रशियाबाहेर पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यांचे आश्वासन दिले आहे.

भारतीयांसाठी युद्धजन्य स्थितीतही रशिया सेफ पॅसेज निर्माण करेल असे पुतीन यांनी मोदी यांना आश्वासन दिले आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे समूह खारकिव्हमधून बाहेर पडावे यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे समूह रशियाकडे नेण्याचा प्रस्तावही रशियाने दिला आहे.

सध्या भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिम सीमांकडे जात आहेत. मात्र आता ईशान्येला असलेल्या रशियाच्या सीमेकडेही भारतीय विद्यार्थ्यांना युद्धजन्य स्थितीत सुरक्षितरित्या नेण्याचा पर्याय रशियाने भारतासमोर ठेवला आहे. रशियाने पुतीन मोदी चर्चेनंतर हे निवेदन जारी केलंय.

PM मोदी यांचा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांच्याशी युक्रेनच्या संकटाच्या (Ukraine Crisis) पार्श्वभूमीवर फोनवर चर्चा केली. दोन्ही प्रमुख नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. पीएम मोदींनी संघर्ष क्षेत्रातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबतही चर्चा केली आहे.

युक्रेनवर रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील हा दुसऱ्यांदा झालेलं संभाषण आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी शेवटचा संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी शांतीचं आवाहन केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *