Ind VS SL | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू श्रीलंका सीरिजमधून बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंका विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कर्णधार म्हणून रोहितची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. रोहितचा कर्णधार म्हणून ही पहिली मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. या मालिकेत रोहित शर्माला टीम इंडियाच्या एका मॅच विनर खेळाडूची उणीव भासेल. त्या खेळाडूच्या उपस्थितीत टीम इंडियाचा विजय आणखी सोपा झाला असता. (ind vs sl test series team india captain rohit sharma will be missed to opener batsman k l rahul in series against sri lanka)

केएल राहुल

निवड समितीने या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलची निवड केली नाही. केएलने आपल्या एकट्याच्या जीवावर टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले आहेत.

टीमला चांगली आणि अपेक्षित सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी आणि त्याचा दबाव हा ओपनर बॅट्समनवर असतो. मात्र केएलने अनेक सामन्यांमध्ये कोणताही दबाव न घेता टीमला चांगली ओपनिंग मिळवून दिली.

रोहित आणि केएल या दोघांची सेट ओपनिंग जोडी होती. मात्र आता केएलच्या अनुपस्थितीत रोहितसोबत ओपनिंग कोण करणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

तसेच केएल वेळ पडली तर विकेटकीपिंगही करतो. त्यामुळे केएल ऑल इन वन खेळाडू आहे. मात्र त्याची श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये निवड करण्यात आली नाहीये. त्यामुळे टीम इंडियाला आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माला केएलची उणीव भासेल, हे नक्कीच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *