महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । भारत गरजेच्या 70% सूर्यफूल तेलाची आयात युक्रेन आणि 20% रशियाकडून करतो, पुरवठ्यात अडथळे येणार एचयूएल, मॅरिको, ब्रिटानिया, नेस्ले यांसहित प्रत्येक एफएमसीजी कंपनी गेल्या तीन महिन्यांपासून महागाईबाबत बोलत आहे. यादरम्यान बिस्कीट, साबण, शॅम्पू, तेल यांसारख्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सतत वाढ झाली आहे. स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. इंधन, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असल्याने जवळपास प्रत्येक वस्तूची किंमत वाढत आहे.
महागाईचा हा मार सध्या थांबणारा नाही. आगामी काही महिन्यांत कौटुंबिक बजेट आणखी वाढू शकते. सूर्यफूल तेल, धातू आणि गहू यांचे सर्वात मोठे उत्पादक देश असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने भारतात या वस्तूंची आयात थांबली आहे. कमी पुरवठा आणि जास्त मागणी यामुळे या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचा थेट परिणाम सूर्यफूल तेल, गहू, एलपीजी, कच्च्या तेलाच्या किमतीवर होत आहे.
दरवाढीमुळे घराचे बजेट बिघडणार
खाद्यतेल: रशिया आणि युक्रेनहून पुरवठा बाधित झाल्याने अनेक देशांत तेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारत सूर्यफूल तेलाची ९०% आयात युक्रेन आणि रशियाकडून करतो. युद्धामुळे त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
एलपीजी: एलपीजीचे दर वाढल्यानेही ग्राहकांचा खिसा कापला जाईल. भारत आपल्या गरजेच्या अर्ध्यापेक्षा जास्त गॅस युक्रेनमधून, तर एलएनजीच्या खपाचा एक लहान भाग रशियाकडून आयात करतो.
गहू : गव्हाचे दर जगभरात वाढले आहेत. रशिया गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे तर युक्रेन गव्हाच्या चार सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे.
दूध: ऊर्जा, पॅकेजिंग, पुरवठा, पशू चारा यांसारख्या इनपुट खर्चात वाढ झाल्याने दूधही महागले आहे. अमूल, पराग, व्हेरका यांसारख्या कंपन्यांनी इनपुट खर्चातील वाढीचा हवाला देत दुधाचा दर २ रुपये प्रति लिटरने वाढवला आहे. इंधन: पुढील आठवड्यात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल आणि इंधनाचे दरही वाढतील. कच्च्या तेलाची किंमत ११३ डॉलर/बॅरल आहे.