महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.