महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine War) युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धामुळे युक्रेनचं बरंच नुकसान झालं आहे. रशिया वारंवार युक्रेनवर हल्ले करत आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ (VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशिया एकामागून एक युक्रेनमधल्या शहरांवर कब्जा करत आहेत. अशातच नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका शॉपिंग सेंटरमधला आहे.
युक्रेनमधून नागरिकांचे बरेच हालखीची दिवस आहेत. सगळीकडे नुकसान होत आहे. त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ युक्रेनमधल्या एका शॉपिंग सेंटरमधला आहे. या व्हिडिओत हताश झालेले लोकं शॉपिंग सेंटर लुटताना दिसत आहेत.
See ya taped on a traffic sign soon.
— Slava Ukraini 🇺🇦 (@uniquetrifolium) March 5, 2022