महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । युद्धानंतर युक्रेनमधूनच स्थलांतर होत नसून हल्ला करणाऱ्या रशियातूनही सुमारे एक लाखावर लोकांनी शेजारी देशांत पलायन केले आहे. वास्तविक अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनी लावलेल्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात रशियन लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ही मंडळी पश्चिमी बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी करत होती. परंतु पलायन करणाऱ्या रशियन लोकांसमोरील मोठी अडचण अशी की त्यांना युरोपियन देश आश्रय देत नाहीत. हे रशियन तुर्की, आर्मोनिया, उझबेकिस्तानसारख्या देशात जात आहेत. रशियात १९२० च्या बोलशेविक क्रांती दरम्यान एक लाख लोकांनी पलायन केले होते. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पोहोचलेल्या इरिनाचे म्हणणे आहे की, आमचे बँक कार्ड ब्लॉक झाले आहे. नोकरी सुटल्यानंतर आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे. एलेक्सी यांचे म्हणणे आहे की, रशियासाठी येणारे दिवस खूप अडचणींचे असतील.
खारकीव्ह : १ दिवसात ६०० इमारती उद्ध्वस्त, ६५ हल्ले
शांतता चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारीही कीव्हमध्ये मोठे बॉम्बहल्ले.
रशिया-युक्रेन युद्ध
20वा दिवस
कीव्हवर मंगळवारी रशियन बॉम्ब हल्ल्यानंतर निघत असलेला धूर
37 रशियन शहरांतून लोकांचे पलायन सुरू. ते शेजारी देशांत जात आहेत.
06 हजार रशियन युद्धानंतर रोज देश सोडत आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता.
मेरियोपूल आणि सुमी शहरांत ३० हजारांहून अधिक लोकांकडे पाणी, रेशन नाही.
रूसी सरकारी टीवी के लाइव शो में एक महिला युद्ध विरोधी पोस्टर के साथ पहुंची।
युक्रेनचे राष्ट्रपती यांनी म्हटले, रशिया युद्ध उन्मादी. युरोपातील इतर देशांवरही हल्ला करेल.