Benefits Of Jeera : उन्हाळ्यात आरोग्यवर्धक ‘जिरे’; फायदे ऐकूण थक्क व्हाल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च । आपल्या भारतीयांच्या घरात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त जेवणाचा स्वाद वाढवत नाहीत तर, ते स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठीही वापरले जातात. तुम्ही घरातील विशेष प्रसंगात किंवा हॉटेलला गेल्यावर जिरा राईस आवडीने मागवत असाल; पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेत का? जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे अनेक समस्यांवर जिरे उपयोगी ठरते. चला तर जाणून घेवूया जिरेच्‍या फायद्‍यांविषयी…

उन्हाळ्यात जिरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

संध्याकाळी जिरे पाण्यात भिजवून ते पाणी सकळी उठव्यानंतर सेवन केल्‍यास वातावरणातील बदलामुळे होणारे आजार उद्भवत नाहीत. तसेच रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्यास मदत होते.
उन्हाचा त्रास जास्त जाणवत असल्यास दोन कप पाण्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडिसाेप व अर्धा चमचा जिरे टाकून उकळून घ्यावे.
उन्हाळ्यात जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियम, लोह आणि फायबर ही पोषकतत्त्व आणि अँटीऑक्सीडंटमुळे पचनक्षमता वाढण्यास मदत होते.
उन्हाळ्यात रोज दुपारी ताकामध्ये जिरापूड घालून ते पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.
सॅलेडमध्ये वरून जिरे पावडर टाकल्यास, तोंडाला चवही येते आणि हे शरीरासाठी पोषकही ठरते.
उन्हामुळे जुलाबाचा त्रास जाणवत असल्यास, जिरे आणि साखर या दोन्हीची पावडर करावी. ती सम प्रमाणात घेऊन एकत्र करावी. एक ते दोन छोटे चमचे थंड पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *