आंबा आवक वाढणार : सामान्यांनाही परवडणार ; महिनाभराने खा भरपूर आंबे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १४ हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये ३०० ते १२०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते २ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढणार असून, बाजारभावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.

रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक होत आहे. बुधवारी ३७७ टन हापूस विक्रीसाठी आला. ५ ते ७ डझनच्या पेटीला २ ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. यावर्षी काेकणात हापूसचे उत्पादन चांगले असून, बाजार समितीमध्ये नियमित आवक सुरू झाली आहे.

२० एप्रिलपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल व मेमध्ये रोज ५० हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हापूसची निर्यातही सुरू झाली आहे. आखाती व इतर देशांमध्ये हापूसला मोठी मागणी आहे. यावर्षी हंगाम चांगला होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *