महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत थांबलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्याची तयारी राज्य सरकारनं केलेय. या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती आहे. ऑनलाईन बदल्यांसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. आणि त्याच्या मदीतनं या बदल्या होती. कोरोना काळात दुर्गम भागातल्या शाळांमध्ये मुलांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र आता दुर्गम भागातही शिक्षकांची नियुक्ती केली जाईल असं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय.