राज्यात उष्म्याची लाट ! चंद्रपूर सर्वांत तप्त , तर पुणे ३९.१ ; अशी काळजी घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । अवकाळी पावसानंतर तयार झालेल्या चक्रवातामुळे हवामानात बदल झाले असून, मध्य महाराष्ट्रापाठोपाठ राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तापण्यास सुरुवात झाली आहे. उष्ण वाऱ्यामुळे तप्त झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, एखाद्या तापत्या भट्टीप्रमाणे दुपार जाणवत आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी ३९.१ कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमानही १९.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पहाटेपासून उकाडा जाणवत आहे. दुपारी काही वेळ ढगाळ वातावरणामुळे वाऱ्याचा वेग मंदावल्याने नाशिककरांना दमटपणा सहन करावा लागला, तर पुढील दोन दिवसांत नाशिकसुद्धा चाळिशीपार जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये ७.५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे पुढील आठवड्यात उष्णतेच्या लहरींची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाजही भारतीय वेधशाळेने वर्तविला आहे.

राज्यात चंद्रपूर सर्वांत तप्त

राज्यात चंद्रपूरमध्ये ४३ हे सर्वाधिक किमान तापमान नोंदविण्यात आले. यासह नागपूर ४०.८, जळगाव ४२.४, अकोला ४२.८, पभरणी ४०.९, औरंगाबाद ३९.५, महाबळेश्वर ३२.६, पुणे ३९.१, मुंबई ३२.६, कोल्हापूर ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जाणवेल. त्यामुळे राज्यात सर्वत्रच उकाडा वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *