Petrol Diesel Price : देशात पेट्रोल डिझेलचे (Petrol & Diesel) इंधनाचे नवे दर जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. रशियामधून कच्च्या तेलाची (Crude Oil) आयात बंद केली आहे. रशिया हा जगातील कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. शनिवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, त्यामध्ये 1.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चे तेल आता 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. एकीकडे अंतरराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. तर दुसरीकडे भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र इंधनाचे दर स्थिर ठेवल्याचे पहायला मिळत आहे. आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चार नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल डिझेलचे (Petrol & Diesel) दर स्थिर आहेत.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *