२५ मार्चला योगी आदित्यनाथ शपथविधी, अखिलेश, ममतांना निमंत्रण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९मार्च । उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेले भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी दुपारी चार वाजता इकाना स्टेडीयम मध्ये दुसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आशहेत. पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आदित्यानाथानी गेल्या ३७ वर्षांच्या अंधश्रद्धेला तडा दिला आहे. या शपथविधी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रक्षामंत्री राजनाथसिंग, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा उपस्थित राहत आहेत तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ज्येष्ठ नेते मुलायमसिंग, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, बहुजन समाजवादीच्या मायावती यानाही आमंत्रण दिले गेल्याचे समजते.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला संघ आणि भाजपचे अन्य वरिष्ठ नेते आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. याच वेळी नवीन मंत्र्यांना सुद्धा शपथ दिली जाईल असे सांगितले जात आहे. या वेळी योगींच्या मंत्रिमंडळात महिला आणि युवा आमदारांना अधिक संधी दिली जाईल असे संकेत दिले गेले आहेत. शपथविधीला राज्य आणि केंद्र सरकारी योजनाच्या लाभार्थीना ही आमंत्रित केले गेले असून साधारण ४५ हजार लोक या वेळी हजर राहतील असे समजते. २०० व्हीव्हीआयपी ना आमंत्रण दिले गेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *