आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना, 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत स्पर्धा सुरू होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.

आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.

सहा संघांच्या या स्पर्धेत आशिया खंडातील पाच संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल.

ACC चे अध्यक्ष म्हणून जय शाह कायम राहणार
एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या बैठकीत सन 2024 पर्यंत जय शाह हे ACC चे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. ACC च्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले आहे की, ACC च्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की ACC अध्यक्ष म्हणून जय शाह यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवण्यात यावा.

पहिले पाकिस्तानात होणार होते आयोजन
आशिया चषक 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होता, परंतु त्यानंतर कोरोना महामारीमुळे तो एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही आणि त्यानंतर 2022 मध्ये श्रीलंकेत T20 फॉरमॅटमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. शनिवारी 19 मार्च रोजी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर औपचारिकपणे सहमती झाली आहे.

आता 2023 आशिया कप पाकिस्तान करणार होस्ट
पुढील वर्षीही आशिया चषक स्पर्धा होणार आहे. त्याचे आयोजन पाकिस्तान करणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) हा निर्णय घेतला आहे. 2023 विश्वचषक पाहता, 2023 आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये असेल. आता भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जातो का हेही पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *