शेन वॉर्न ! फ्रेंड्स अँण्ड फॅमिलीनं दिला अखेरचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । क्रिकेट जगतात आपल्या फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या शेन वॉर्नला (Shane Warn) मेलबर्न येथील St Kilda Football Club च्या मैदानातून रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. 4 मार्च 2022 रोजी थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नचे ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झाले होते.

वॉर्नची तीन मुले ब्रुक 24, जॅक्सन 22 आणि 20 वर्षीय समर यांच्यासह वॉर्नचे आई वडील अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मार्क टेलर, एलन बॉर्डर, इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याच्यासह 80 लोक शेन वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. (Shane Warne’s family and friends say goodbye at private funeral)

दिग्गज फिरकीपटूच्या निधनानंतर त्याचा मृत्यू नैसर्गिक झालाय की संशयास्पद यासंदर्भात चर्चा रंगली होती. याप्रकरणात थायलंड पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपासही केल्याचे पाहायला मिळाले. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात खासगी जेटने वॉर्नचे पार्थिव थायलंडहून मेलबर्नला आणले होते. मेलबर्न ग्राउंडवर त्याच्या अंत्यविधीचा सोहळा पार पडणार, अशी चर्चाही रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *