महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. रशियाने या वादात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेल्याने हा संघर्ष थांबण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नाहीये. त्यातच आता एक अत्यंत मोठी घटना समोर येत असून, रशियन सैन्याच्या हल्ल्यांपासून स्वत:ला वाचण्यासाठी मारियुपोलमध्ये येथील एका भागात तब्बल दोन हजारांपैक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तसंच ताज्या माहितीनुसार मारियुपोल म्हणतात की, रशियन सैन्याने एका आर्ट स्कूलवर बॉम्ब टाकला. याठिकाणी 400 निर्वासितांनी आश्रय घेतलेला होता.
रशियन सैन्याने मारीपॉल बंदरावरील एका सुरक्षित स्थळी थांबलेल्या लोकांना घेरून घेतलेलं होतं. याठिकाणी लपलेल्या निर्वासितांचं अन्न, पाणी आणि वीजही रशियन सैन्याने बंद केली होती. तर चहुबाजूंनी या भागावर जोरदार बॉम्ब हल्ले केले जात होते. त्यामुळे आतापर्यंत याठिकाणी तब्बल 2300 लोक मारले गेले असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रशिया युक्रेन संघर्षांमधील ही आतापर्यंतची सर्वात धक्कादाय घटने असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. तसंच रशियन सैन्याने ज्या आर्ट स्कूलवर बॉम्ब टाकला. याठिकाणी 400 निर्वासितांपैकी सर्वजण मारले गेल्याची भीती स्थानिक माध्यमांनी वर्तवली आहे.
दरम्यान, रशियाकडून केले जाणारे हल्ले थांबवण्याचं आवाहन वारंवार नाटोकडून केलं जातंय. त्यानंतर आता रशियाने थेट नाटोविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्याकडे नाटोच्या विरोधात योजना आहेत, असं रशियन मुत्सद्दींनी म्हटलं आहे. बोस्निया आणि हर्जेगोव्हिनामधील रशियन राजदूत इगोर कालाबुखोव्ह यांनी बोस्नियाच्या फेस टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “आमच्याकडे नाटोविरूद्ध लढण्यासाठी योजना आहेत. मॉस्को आता फक्त भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीचा अभ्यास करत आहे. नाटोकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांनाही उत्तर दिलं जाईल” असं रशियन मुत्सद्दींनी म्हटल्याचं वृत्त, कीव इंडिपेंडंटने दिलं आहे.