महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । जिल्हा प्रतिनिधी :-सलमान मुल्ला । कळंब । विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी सार्वजनिक पाणवठ्यावर महाड येथील चवदार तळयावर दि.२० मार्च १९२७ रोजी सत्यागृह केला होता.
ह्या सत्याग्रहाला दि.२० मार्च २०२२ रोजी ९५ वर्षे पूर्ण झाली.यानिमित्ताने स्मारक समिती,कळंब च्या वतीने शहरातील विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्मारक समितीचे विश्वस्त सुनिल गायकवाड,दिलीप कसबे,प्रमोद ताटे,सुरजकुमार गायकवाड,सागर पट्टेकर,मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सतपाल बचूटे,कोषाध्यक्ष शिवाजी सिरसट,सचिव राजाभाऊ गायकवाड,प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,कार्यकर्ते निलेश गवळी आदी सदस्य उपस्थित होते.