महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३१ मार्च । मद्याची दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड – किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. तसेच यापुढे दह पेक्षा कमी कामगार असणाऱ्या दुकानांना देखील मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक असणार आहे.
मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (फॉन्ट) ह इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार असल्याचे नियमावलीत नमूद केले आहे. याचे उल्लंघन केल्यास एक लाखापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये दहापेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी देवनागरी लिपीतील नामफलकाचा अधिनियम दिनांक १७ मार्च रोजी जारी झाला असून यापुढे सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक अनिवार्य असणार आहे.