Dream 11 ; LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ आमने-सामने, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मार्च । आज आयपीएल 2022 चा सातवा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) दमदार संघ चेन्नई सुपरकिंग्स आज दुसऱ्यांदा मैदानात उतरेल. तर त्यांच्या समोर यंदा नव्याने सामिल झालेला लखनौ सुपरजायंट्सचा संघ असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी आपले पहिले सामने गमावल्याने त्यांना आता पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे.

आज पार पडणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी पहिला सामना आणि सध्याच्या फॉर्मचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for csk vs lsg) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया…

चेन्नईची संभाव्य अंतिम 11

ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे

लखनौची संभाव्य अंतिम 11

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनिष पांडे, एविन लुईस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, आवेश खान, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुश्मिंता चमिरा

Top Players

C ऋतुराज गायकवाड ,केएल राहुल ,मोईन अली, रवींद्र जाडेजा , कृणाल पंड्या,  wc दीपक हुडा, आयुष बडोनी,एमएस धोनी (विकेटकीपर),ड्वेन ब्राव्हो, रवी बिश्नोई, दुश्मिंता चमिरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *