महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या आधारे आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोने-चांदी दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. ग्लोबल मार्केटमधील किंमतीचा परिणाम भारतीय बाजारातही झाला. डॉलरची मजबूती आणि रशिया-युक्रेनमधील चर्चत काहीशी प्रगती झाल्याचा परिणाम सोने-चांदी दरावर दिसून आला.
MCX वर गोल्ड फ्यूचर्स 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 51,953 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर सिल्व्हर फ्यूचर्स 0.40 टक्क्यांच्या घरणीसह 67,217 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. एक दिवस आधीच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा भाव 490 रुपयांनी वाढून 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढून 67,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.