आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा, मेट्रो-३ चा प्रश्‍न निकाली काढा; फडणवीसांचा खोचक टोला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोच्या 2-ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. भाजप शिवसेना काळात सुरू मेट्रोचं काम झालं होतं. या मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. आज प्रसारमाध्यांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेट्रो सुरू होते असल्याचा आनंद आहे. आम्हाला बोलाविले नाही, तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा’, असे ते म्हणाले. जनतेला माहिती आहे की, या दोन्ही मेट्रोचे काम मी सुरू केले होते आणि ते पुढेही गेले होते. या सरकारमध्ये ते रखडले, पण आज ते सुरू होत आहे. याचा आनंद आहे. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा. मेट्रो-3 चा प्रश्‍न निकाली काढा. कारण, जी मेट्रो 3 जी आतापर्यंत सुरू झाली असती. ती आता आणखी चार वर्ष सुरू होणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावे, पण अपयशाचे भागिदार होऊ नये. सरकारने मेट्रो ३ चा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई मेट्रो 7 दहिसरहून अंधेरी पूर्व आणि मुंबई मेट्रो 2 ए दहिसरहून अंधेरी पश्चिम डीएननगरपर्यंत धावणार आहेत. यामुळे आता मुंबईकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी दूर होणार आहे. मुंबई ‘मेट्रो 7’ च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *