महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । सोन्याचा दर गेल्या २४ तासांत स्थिर राहिला आहे. काल सोन्याचा भाव आजच्या प्रमाणेच नोंदवला गेला. भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 47,800 रुपये आहे. सोन्याच्या भावात स्थिरता दिसल्याने हा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. येत्या दिवसात सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ दिसू शकते. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनी आजच सोने खरेदी करावे.
गेल्या २४ तासांत भारतातील विविध शहरात सोन्याच्या किमतीत किरकोळ चढउतार दिसून आला. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,820 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 48,420 आहे.
याशिवाय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट 47,800 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये आहे तर 22 कॅरेट 47,800 रुपये आहे. दुसरीकडे, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचाभाव 47,800 रुपये आहे.