आता एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । सायबर दरोडेखोरांकडून केल्या जाणार्‍या कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढीस लागल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता एटीएम सेंटरमध्ये आपल्याला कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. थोडक्यात ही प्रक्रिया आता कार्डलेस होणार आहे.

बँकिंग प्रणालीमध्ये आणि एकंदरच आर्थिक व्यवहारांमध्ये सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत मोबाईलवरून पाच रुपयांपासून लाखो रुपये काही क्षणात दुसर्‍या व्यक्तीला ट्रान्स्फर करता येतील, ही संकल्पना स्वप्नच वाटायची. पण यूपीआयच्या माध्यमातून ती केवळ प्रत्यक्षातच आली नाही, तर अगदी गावा-खेड्यापर्यंत पोहोचली. बँकांमध्ये जाऊन पैसे काढणे, धनादेशांचा वापर करणे किंवा रांगेत थांबून एटीएममधून पैसे काढणे या गोष्टी कराव्या लागायच्या.

पण आता त्यासाठीची किमान पर्यादा ओलांडल्यानंतर शुल्क भरणे अशा अनेक गोष्टींमधून लोकांची यूपीआयमुळे सुटका झाली. इतकेच नव्हे, तर मोबाईल बिल, टेलिफोन बिल, गॅस बुकिंगपासून ऑनलाईन वस्तू मागवणे यांसारख्या गोष्टीही पेमेंट अ‍ॅपमुळे अतिसुलभ बनल्या. यूपीआयचा वापर इतर गोष्टींत बराच वाढला असला तरी आजही रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तथापि, आजच्या घडीला रोख रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍यांची संख्या रोडावली आहे. कारण हल्ली बहुतांश बँकांनी एटीएमची सुविधा बचत, चालू खातेदारांना सहज देऊ केली आहे. त्यामुळे बहुतांश जण एटीएम सेंटरमधून रोख रक्कम काढण्याचा सोपा पर्याय स्वीकारतात.

खरे पाहता एटीएमची व्यवस्था ही सुरक्षित आहे. परंतु अलीकडील काळात सायबर गुन्हेगारांनी अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केल्यामुळे या सुरक्षेलाही आता भगदाड पाडले जाऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. एटीएम सेंटरमध्ये स्किमर लावून कार्ड क्लोनिंग करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *