मुसळधार पाऊसाची शक्यता, ‘या’ राज्यांना बसणार उन्हाचा तडाखा; जाणून घ्या प्रत्येक राज्यातलं Weather अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । देशातील बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप वाढत आहे. (Heat Wave Increasing) तर तेच दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ईशान्य भारत, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या दक्षिणेकडील राज्यांसह तमिळनाडू आणि केरळमध्ये या आठवड्यात पाऊस पडू शकतो. त्रिपुरामध्येही पुढील पाच दिवस पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे.

भारतीय हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार, 12 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होईल, ज्यामुळे उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. पुढील 5 दिवसांत या राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे येथील लोकांना उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा मध्ये पुढच्या पाच दिवसांत पाऊस होण्याची शक्यता हवामावन विभागाने वर्तवली आहे. आसाममध्ये 11, 12, 13 आणि 14 एप्रिलला तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 13 आणि 14 एप्रिलला अरुणाचल प्रदेश आणि नागालॅंड, मणिपूर, मिझोरम तर त्रिपुरामध्ये 10, 13 आणि 14 एप्रिलला पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, लक्षद्वीप क्षेत्र, तटीय आंध्रप्रदेश के राज्यों में केरल और तमिलनाडु, पुदुचेरी, कराइकल, लक्षद्वीप क्षेत्र, तटीय आंध्र प्रदेश, किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.

या राज्यात आणखी तापमान वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 12 ते 14 एप्रिलपर्यंत पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्र शक्यता आहे. उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम) आणि पश्चिम मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील. झारखंडमध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *