महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या शिवतीर्थ (Shiv Tirtha) या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माझ्या ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत. ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.
ठाण्याची सभा ही उत्तरसभा आहे. ठाण्याच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील त्यामुळे तू ठाण्याच्या सभेत ये, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी 100 टक्के आहे, मी मनसेत आहे आणि मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.