महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात आज (सोमवार) आयपीएल स्पर्धेचा 21 वा सामना होत आहे. या सिझनमध्ये पदार्पण करणारी गुजरात टायटन्सच्या टीममध्ये यंदा चांगलीच फॉर्मात आहे. त्यांनी तीन्ही सामने जिंकलेले आहेत. तर हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत या सिझनमधील पहिला विजय मिळवून दिला आहे.
गुजरात टायटन्सकडून प्रत्येक मॅचमध्ये नवा विजेता खेळाडू समोर येत आहे. पंजाब किंग्ज विरूद्ध शुभमन गिलनं सर्वोत्तम स्कोर केला होता. तर राहुल तेवातियानं शेवटच्या दोन बॉलवर सिक्स लगावत गुजरातला विजय मिळवून दिला. तर हैदराबादकडून ओपनर अभिषेक शर्मानं 75 रनची खेळी करत टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हा फॉर्म कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि एडन मार्करामवर हैदराबादच्या बॅटींगची भिस्त आहे.
कॅप्टन: शुभमन गिल / हार्दिक पंड्या
व्हाईस कॅप्टन: साई सुदर्शन / अभिषेक शर्मा
विकेटकीपर: निकोलस पूरन
बॅटर: शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, साई सुदर्शन, केन विलियमसन
ऑल राऊंडर: हार्दिक पंड्या, वाशिंगटन सुंदर, अभिषेक शर्मा
बॉलर: शमी , टी. नटराजन, लॉकी फर्ग्युसन
गुजरात टायटन्सची टीम : शुभमन गिल, ऋद्धीमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, डोमनिक ड्रेक्स, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, रहमामुल्लाह गुरबाज, यश दयाल, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, गुरुकीरत सिंग, बी. साई सुदर्शन
सनरायझर्स हैदराबादची टीम : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन, निकोलस पूरन, एडन मार्करम, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, सौरभ दुबे, शशांक सिंग, सीन एबॉट, आर समर्थ, रोमारियो शेफर्ड, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फझलहक फारुकी