Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘उत्तर सभे’साठी हिंदीत झळकला बॅनर ; हिंदूओंका राजा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ एप्रिल । मनसेप्रमुखराज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. सायंकाळची होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. यावेळी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात ते मनसे पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी या सभेची जोरदार तयारी मनसेकडून सुरू आहे. त्यातच, ठाण्यातील मनसे विभाग अध्यक्षाने लावलेला डिजिटल फलक चर्चेचा विषय बनला आहे.

ठाण्यातील विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भातील एका डिजिटल बॅनर लावला आहे. विशेष म्हणजे तो बॅनर हिंदीत लिहिला असून त्यावर हिंदूओंका राजा, अशी उपाधी राज ठाकरेंना देण्यात आली आहे.

मुंबई मे बैठा है हिंदूओंका राजा !
अपनी हिफाजत चाहिए तो मनसे मे आजा !!

मनसेनं गेल्या काही वर्षांपासून थेट हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरू केल्याचं दिसून येत आहे. त्यातूनच, मनसेनं पक्षाचं झेंडा आणि हिंदूत्त्वाची विचारधारा धरल्याचं अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, आज ठाण्यात होणाऱ्या उत्तर पूजा सभेत राज ठाकरे काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. मंगळवारी होणाऱ्या उत्तरसभेत ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. परंतु, त्यासाठी शहर मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी हातात भगवे झेंडे घेऊन तब्बल २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *