महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ एप्रिल । आज म्हणजे बुधवारी सलग सातव्या दिवशी तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आपली भाववाढ थांबवली आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त असल्याने कंपन्यांनी दरवाढ थांबवली असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे.
22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलची किंमत 14 वेळा वाढल्यानंतर थांबली आहे. पेट्रोल पंप डीलर्सचे म्हणणे आहे की जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्या आहेत, त्यामुळे कंपन्यांनीही त्यांच्या किमती वाढवणे थांबवले आहे. असं असलं तरी, गेल्या 14 दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेल आधीच 10 रुपयांनी महाग झाले आहे आणि कंपन्यांना सध्याच्या किमतीत पूर्ण मार्जिनही मिळत आहे.
मुंबईत पेट्रोल (Mumbai Petrol Price) 120.51 रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आहे. यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्यानंतर तेल कंपन्यांनी आपला तोटा भरुन काढण्यासाठी किमती वाढवल्या होत्या. 16 दिवसांत 14 वेळा किमती वाढवल्या (Petrol Diesel Price Hike) आहेत.
चार महानगरात पेट्रोल-डिझेलचे दर
>> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर
>> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर