नारायण राणेंना अटक करून चर्चेत आलेल्या ‘या’ पोलीस कमिश्नरची बदली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । नाशिक शहराचे डॅशिंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांची बदली झाली असून नवीन पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक शहरात पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात दीपक पांडेय यशस्वी राहिले. त्यात दीपक पांडेय यांची हेल्मेट सक्ती असो किंवा महसूल आयुक्त विरोधात आकारलेला लेटर बॉम्ब असो, दीपक पांडेय नेहमीच चर्चेत राहिले आहेत. (by arresting narayan rane who came into the discussion nashik police commissioner deepak pandey transferred)

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सुद्धा सर्वात पहिला गुन्हा हा नाशिक शहरात दाखल झाला होता. त्यावर दीपक पांडेय यांनी कारवाईचे पाऊल उचलत नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस कोकणात रवाना केले होते. या कारवाईनंतर नाशिक पोलीस आयुक्त पांडेय हे राज्यात गाजले होते.

 

मशिदींवरील भोंग्याबाबतही घेतला निर्णय

त्यानंतर शहरात नागरिकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळावे या उद्देशाने आयुक्त दीपक पांडेय यांनी नाशिक शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यांची ही कारवाई देखील गाजली होती. मशिदीवरील भोंगे तसेच धार्मिक स्थळावरील भोंगे यासाठी परवानगी आवश्यक असल्याचा आदेश देखील नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढला होता. हा आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम काढणारे दीपक पांडेय हे एकमेव पोलीस आयुक्त ठरले आहे. या ना त्या कारणावरून दीपक पांडेय हे नेहमी चर्चेत राहिल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *