महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले. राष्ट्रीय बाजारात 15 व्या दिवशीही इंधनाच्या दरात कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही. म्हणजेच देशात तेलाच्या किमती स्थिर आहेत. 6 एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात 80 पैशांची वाढ झाली होती, तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
शहर डिझेल / पेट्रोल
दिल्ली 96.67 / 105.41
मुंबई 104.77/ 120.51
कोलकाता 99.83/ 115.12
चेन्नई 100.94/ 110.85
या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-
या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.