महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : कोरोना व्हायरस भारतात वेगाने फोफावताना दिसत असून देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 5000 पार गेला असून आतापर्यंत 166 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर एकूण 410 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 5734 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, आंध्रप्रदेशमध्ये 305 लोक या महामारीचे शिकार झाले आहेत. तर आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.