महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ; कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच लॉकडाऊन करण्यात आलंय. यामुळे दिल्लीतील सराफा बाजार बंद आहे. सोन्या-चांदीच्या दरात या काळात मोठे बदल झालेल्या पाहायला मिळत आहेत. बुधवारी सुरूवातीच्या काळात बाजारात सोन्या-चांदीचे दरात कमी पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर दरात वाढ पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचं दर वाढला असून ४४,८९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
सोन्या-चांदीने हा नवा उच्चांक गाठला आहे. चांदीने देखील ४६ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. महत्वाचं म्हणजे या आठवड्याभरात सोन्याच्या दरात ५,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे बाजार बंद आहे पण मल्टि कमोडिटी एक्स्चेंज सुरू असल्याने सोन्या-चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.