युपीत पोस्टरबाजीतून राज ठाकरे अयोध्या दौ-याला तीव्र विरोध

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला उत्तर प्रदेशमध्ये जोरदार विरोध असल्याचे चित्र आहे. कैसरगंज येथील भाजप खासदार आणि भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज यांना उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा सिंह यांनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 17 एप्रिल रोजी गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांच्याविरोधात अयोध्येत पोस्टरबाजी केली जात आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्याकडून केली जात आहे.

https://www.facebook.com/brijbhushansharan/posts/547224816763412

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी युपीच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया आणि प्रत्यक्षरित्या मोठे समर्थन मिळत असल्याचा दावा केला आहे.

“राज ठाकरे परत जा”, या मथळ्याखाली पोस्टरबाजी अयोध्येत केली जात आहे. या पोस्टरमध्ये म्हटलंय की, “उत्तर भारतीयोंको अपराधी कहने वाले राज ठाकरे माफी मांगो या फिर वापस जाओ”, असा मजकूर लिहिला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. तसेच, खासदार सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी 5 जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचं सागत या अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *