महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । बाजारात आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना ठिकठिकाणी आंबा ज्यूस; तसेच लिंबू सरबत 10 रुपयांना मिळत आहे. आरोग्यास अपायकारक अशा सिजनिंग पावडरपासून हे ज्यूस बनविले जात असल्याची माहिती पुढे येत आहे.
शहरातील तापमानाने चाळीसी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा उन्हाच्या तडाख्यात रसरसीत आणि थंडगार फळांचा ज्यूस कुणाला आवडणार नाही; मात्र शहरात अनेक ठिकाणी ज्यूसच्या स्टॉलवर फळांऐवजी मिळतेय सिजनिंग पावडर पासून बनविलेले धोकादायक ज्यूस.
परंतु याकडे अन्न व औषध प्रशासनाचेे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्यास अपायकारक पेय सर्रासपणे स्टॉलवर विकले जात आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील परिसरात जागोजागी ज्यूसचे स्टॉल थाटले आहेत.यामध्ये बरेच स्टॉलधारक फळे महाग असल्याने फळांऐवजी मानवी आरोग्यासाठी घातक असणार्या सिजनिंग पावडरचा वापर करत आहेत. यामुळेे शरीरावर धोकादायक परिणाम होवू शकतो, अशी माहिती शहरातील आहारतज्ज्ञांनी दिली आहे.
बदाम आंबा
120 ते 150 रू. किलो
तोतापुरी
130 ते 170 रू. किलो
मात्र आमरस चक्क 10 रूपयाला?
सरबत
लिंबू : 10 ते 15 रूपये नग मात्र सरबत अवघे 10 रूपयाला?