महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान करणे मूलभूत हक्क नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बदायूंचा रहिवासी इरफानची याचिका फेटाळत न्या. बी.के. विदला आणि न्या. विकास यांच्या पीठाने शुक्रवारी सांगितले की, अजान, इस्लामचा अविभाज्य भाग आहे. मात्र, लाऊडस्पीकरवर ती करणे मूलभूत हक्क नाही. यासंदर्भात याआधीही न्यायालयांनी निकाल दिला आहे. इरफानने नुरी मशिदीसाठी लाऊडस्पीकरवर अजानची परवानगी मागितली होती, मात्र न्यायपीठाने ती फेटाळली.