‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार असतानाच आता शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत फडकविण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवसेना – मनसेमधील वाद हा थेट अयोध्येत पोहोचला आहे.

बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांची हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले.

आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राज यांच्या पूर्वी ते अयोध्येला धडकणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राज यांच्या माफीनाम्याचे मागणी केली जात असताना आता शिवसेनेने राज यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *