Chardham Yatra 2022 : कोरोना संकटानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले : भाविकांमध्ये यात्रेचा उत्साह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । हिवाळ्यात बंद असलेले बद्रिनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे आज सकाळी 6 वाजता उघडले. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बद्रिनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सायंकाळी 6.15 वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले. बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यासाठी आदि शंकराचार्यांचे सिंहासन आणि भगवान विष्णूचं वाहन गरुडजींची मूर्ती तेल कलश (गाडूघडा) यात्रेसह जोशीमठच्या नरसिंह मंदिरातून त्यांच्या पुढील मुक्कामाला, योग-ध्यान बद्री मंदिर पांडुकेश्वर येथे नेण्यात आली.

भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण

चारधाम यात्रेत (Chardham Yatra 2022) मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. पण एका दिवसांत केवळ 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून काल सर्व तयारी पूर्ण झाली होती. अशातच आज सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या उत्साहात यात्रेला सुरुवात झाली आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळपासूनच भाविकांची उपस्थिती

राज्य सरकारनं आधीच निर्णय घेतला होता की, एका दिवसांत केवळ 12 हजार भाविक केदारनाथ आणि 15 हजार बद्रीनाथला भेट देऊ शकतील. आज सकाळपासूनच बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *