CSK vs DC Head To Head: प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईशी भिडणार, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड रेकॉर्ड
चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 26 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 16 सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. चेन्नईच्या संघानं दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 222 धावांची खेळी केली आहे. तर, 110 सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय, दिल्लीच्या संघानं चेन्नईसमोर 198 धावांची सर्वात मोठी धावसंख्या केली होती. तर, चेन्नईविरुद्ध एका सामन्यात दिल्लीचा संघ 83 धावांवर ढेपाळला होता.

चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन:
डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *