‘या’ राज्यात पहाटे तीन वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मिळणार दारु : निर्णयानंतर राजकारण तापले,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । नवी दिल्ली । बार आणि रेस्टॉरंट्समध्ये (Bar and Restaurants) पहाटे तीनपर्यंत दारु देण्याची परवानगी दिल्ली (Delhi Government)राज्यात बार चालकांना मिळाली आहे. दिल्ली सरकारने हा धोरणात्मक (liquor policy)निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटे तीनपर्यंत दिल्ली राज्यातील नागरिकांना बारमध्ये दारु दिली जाणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत अबकारी विभागाला दिल्ली सरकारने आदेश जारी केले आहेत, या आदेशाचे अधिकृत पत्र लवकरच जारी करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या २०२१–२२ च्या नव्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीत सध्या रेस्टॉरंट आणि बारना रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. जर ही वेळ पहाटे तीनपर्यंत करण्यात आली तर अबकारी विभाग पोलीस आणि इतर विभागांसोबत काम करेल. नोव्हेंबर २०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या धोरणानुसार शेजारी असलेल्या शहरांच्या वेळांप्रमाणे दिल्लीतील बारच्या वेळा असाव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे.

एनसीआर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये पहाटे तीनपर्यंत परवानगी
दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर, हरियाणातील गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये पहाटे तीनपर्यंत बार सुरु ठेवण्यास आधीच परवानगी आहे. उ. प्रदेशात नोएडा आणि गाझइयाबादमध्ये बारना रात्री एक पाजेपर्यंत पवानगी आहे. दिल्ली हे राजधानीचे शहर आहे, या शहरात सुमारे ५५० स्वतंत्र रेस्टॉरंट आहेत, ज्यात महसूल विभागाच्या लायसन्सवर भारतीय आणि परदेशी दारु दिली जाते. तर सुमारे १५० रेस्टॉरंट्स, मॉटेल्स असे आहेत की ज्यात २४ तास दारु दिली जाते. अशा रेस्टॉरंट्सना विशेष लायसन्स दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *