महाराष्ट्रात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन -मुंबई : राज्यात काल (ता.१०) कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील –

मुंबई – ८७६ (मृत्यू ५४)

पुणे मनपा -१८१ ( मृत्यू २४)

पुणे (ग्रामीण) -०६

पिंपरी चिंचवड मनपा-१९

सांगली – २६

ठाणे मनपा -२६ (मृत्यू ०३)

कल्याण डोंबिवली मनपा-३२ (मृत्यू ०२)

नवी मुंबई मनपा- ३१ (मृत्यू ०२)

मीरा भाईंदर- ०४ (मृत्यू ०१)

वसई विरार मनपा- ११ (मृत्यू ०२)

पनवेल मनपा-०६

ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १)- प्रत्येकी ०३

नागपूर -१९ (मृत्यू ०१)

अहमदनगर मनपा १६

अहमदनगर ग्रामीण ०९

उस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यू २), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यू २) प्रत्येकी ०४

लातूर मनपा -०८

औरंगाबाद मनपा-६ (मृत्यू ०१)

बुलढाणा -११ ( मृत्यू ०१)

सातारा – ०६ (मृत्यू ०१)

अकोला -०९

कोल्हापूर मनपा -०५

मालेगाव- ०५ (मृत्यू ०१)

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, बीड, सिंधूदूर्ग, जळगाव प्रत्येकी )

एकूण- १३६७ त्यापैकी १२५ जणांना घरी सोडले तर ९७ जणांचा मृत्यू

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *