महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ मे । ब्रॅण्डेड गोष्टी वापरण्याचा अनेकांना शौक असतो. मग ते काहीही असो त्यांच्यासाठी ब्रॅण्ड महत्वाचा असतो. अशाच एका आलिशान ब्रॅण्डने शूज लॉन्च केले आहेत. मात्र हे शूज सगळीकडे चर्चेचा विषय झाले आहेत. लाखोंची किंमत असलेले हे शूज पाहून नेटकरी संतापले आहेत. ब्रॅण्डचे हे नवीन कलेक्शन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होतयं.
Balenciaga हा आलिशान ब्रॅण्ड सध्य़ा प्रचंड ट्रोल होत आहे. त्यांनी लॉन्च केलेले स्नीकर्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. ‘पॅरिस स्नीकर’ या कलेक्शनने हाय टॉप आणि बॅकलेस म्यूल अशा दोन शैलीत हे स्नीकर्स लॉन्च केले गेले होते. हे स्नीकर्स 48 हजारांपासून 1लाख 44 हजारपर्यंत आहे. विशेष म्हणजे हे शूज फाटलेले, कळकट,मळकट अशा अवस्थेत आहेत. शिवाय जितके स्नीकर्स जूने तेवढी त्याची किंमत जास्त आहे. लिमिटेड एडिशनचे हे स्नीकर्स 100 जोडे उपलब्ध आहेत. जे Balenciaga नव्या कॅम्पेनचा भाग असून स्नीकर्स आयुष्यभर घालण्यासाठी आहेत असे सांगतात.