महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ मे । किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह 15 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 लाखांच्या आमिषाने एका महिलेची किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्च मध्ये उघड झाला होता. याप्रकरणात राज्य आरोग्य विभागाने यापूर्वी रुबी हॉल रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केलेला आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.
किडणी प्रत्यारोपणाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरेगांव पार्क पोलीस करत आहेत.