पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर CBIची छापेमारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मे । CBI Raid on Karti Chidambaram House: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयचे छापेमारी केली आहे. दिल्ली आणि चेन्नईत हे छापे टाकण्यात आले आहेत. (CBI Raid on Karti Chidambaram House: CBI raids on the premises of P Chidambaram’s son Karti, raids in Delhi and Chennai)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकला आहे. सीबीआय कार्ती चिदंबरमच्या दिल्ली आणि चेन्नईतील 7 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मात्र, ही छापेमारी कोणत्या प्रकरणात आहे, याबाबत सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पी चिदंबरम हे काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *