Monsoon Updates : ‘या’ दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मे । हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी, काही दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आणि इथं सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. आला रे बाबाsss ; असं म्हणत या मान्सूनरुपी पाहुण्याचं स्वागत सर्वांनीच केलं आणि तो आपल्या दारी अर्थात महाराष्ट्रात कधी येणाच याचीच उत्सुकता सानथोरांना लागून राहिली. (Monsoon uodates )

व्हायचं तेच झालं…
तिथं मान्सूनचं अंदमानात आगमन झालेलं असतानाच आता केरळातही तो 25 ते 27 मे या दिवसांदरम्यान पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनसाठी सर्व परिस्थिती पूरक असल्यामुळं त्याचा प्रवास हा अतिशय वेगानं होत असल्याचं हवामान विभागाच्या माहितीत म्हटलं आहे. केरळमध्ये आल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येण्यास फार वेळ जाणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. (Rain updates )

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा आणि त्यांना मिळालेली गती पाहता 10 जूनऐवजी तळकोकण आणि बहुतांश कोकण किनारपट्टी भागामध्ये मान्सून 2 जूनला धडकणार असल्याची चिन्हं आहेत. (Maharashtra rain)

तापमानात घट…
मान्सूनची वाटचाल पाहता सूर्याचा दाह सहन करणाऱ्या सर्वांनाच काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण, तापमानाच दोन ते तीन अंशांनी घट होणार असल्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाला मान्सून समजू नका…
मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, हा मान्सून नसून, अवकाळी पाऊस आहे. परिणामी या पावसाला मान्सून समजण्याची चूक करु नका कारण, या पावसानंतर तापमानात वाढ झाल्याचं निरिक्षणास आल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *