माध्यमांवर चिडले ; राज ठाकरेंची ५० हजारांची पुस्तक खरेदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तकं खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सुनावलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी थोडीथोडकी नव्हे, तर २०० हून अधिक पुस्तकं खरेदी केली आहे.

राज ठाकरे यांची वाचनाची आवड सर्वश्रुत आहे. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर (Raj Thackeray Pune Visit) असताना त्यांनी अक्षरधारा बुक गॅलरीतून तब्बल ५० हजारांची खरेदी केली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवरील २०० हून अधिक पुस्तकं खरेदी केली आहे. यामध्ये गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तकं त्यांनी खरेदी केली आहेत.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे अक्षरधारा बुक गॅलरी इथं आले होते. त्यांनी साधारण दीड तास इथे घालवला. या वेळात त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकं चाळली. त्यांनी वा.सी.बेंद्रे यांच्या रियासतचे सर्व खंड, मृत्यूंजय, छावा, युगंधर या पुस्तकांच्या डिलक्स आवृत्ती ही पुस्तकं खरेदी केली. तसंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती (Raja Shiv Chhatrapati by Babasaheb Purandare) या चरित्रग्रंथात प्रसिद्ध चित्रकार दिनानाथ दलाल यांनी रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित कऱण्यात आला आहे. त्याचीही माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *